Vijay Wadettiwar On Bjp| जातनिहाय जनगणनेवरून वडेट्टीवारांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल |
जातनिहाय जनगणनेसाठी केंद्र सरकारकडून चाचपणी सुरु आहे. इंडिया आघाडी तसेच मित्र पक्षाच्या मागणीमुळे भाजपवर दबाव वाढलेला आहे. जातनिहाय जनगणनेसाठी इंडिया आघाडी तसेच मित्र पक्षाकडून वाढत चालेला दबाव पाहता केंद्रातील भाजपाखालील मोदी सरकार ही मागणी मान्य करण्याच्या दृष्टीने विविध दृष्टीकोनातून चाचपणी करत आहेत. भाजपतीलच इतर मागासवर्गीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे घटक जनगणनेच्या प्रस्तावाच्या बाजूने असल्याने केंद्र सरकार आता त्या दृष्टीने विचार करत आहेत भाजपाचे मित्र पक्ष असलेल्या तेलगू देशम पार्टी जनता दल आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या नेतृत्त्वाखाली जनशक्ती पार्टीने जात जनगणने बाबत उघटपणे सकारात्मक भूमिका व्यक्त केली आहे.
यापार्श्वभूमीवर वडेट्टीवार म्हणाले, चाचपणी होत असेल तर आनंदाची गोष्ट आहे, जातनिहाय जनगणना व्हावी. ज्यांच्या समाजामध्ये आज जी काय तड निर्माण झाली आरक्षणावरून तर त्याच्यावरचा एकमेव तोडगा ही जातनिहाय जनगणना असेल त्याशिवाय दुसरा मार्ग असू शकत नाही. त्यासाठी आमच्या नेत्यांनी राऊलजींनी हा निर्णय घेतला आहे आणि त्याला प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी सरकार घाबरलेली आहे आणि त्यासाठी ज्या जाती आहेत त्या विरोधात जाऊ नये यासाठी त्यांनी ही चाचपणी सुरु केली असावी असं मला वाटतं, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.