Vijay Wadettiwar : हिंगोलीच्या ओबीसी मेळाव्याला जाण्याचा निर्धार

हिंगोलीच्या ओबीसी मेळाव्याला जाणारच असा निर्धार विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
Published by :
Team Lokshahi

हिंगोलीच्या ओबीसी मेळाव्याला जाणारच असा निर्धार विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. अंबडच्या मेळाव्यात भुजबळांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्यानंतर वडेट्टीवारांनी भुजबळांशी थोडी फारकत घेतली होती. पण आता वडेट्टीवारांनी युटर्न घेतला असून हिंगोलीच्या मेळाव्यात भुजबळांसोबत जाणार असल्याचं सांगितलं आहे. ओबीसींवर अन्याय होत असताना त्यांना एकटं सोडणार नाही अशी भूमिकाही वडेट्टीवार यांनी मांडली आहे. त्यामुळं हिंगोलीच्या मेळाव्यात हजर राहणारच असं वडेट्टीवारांनी ठणकावून सांगितलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com