Vijay Wadettiwar : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका

आता शासन नेमकं कुणाच्या दारी? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

अप्पर वर्धा धरणग्रस्तांकडून मंत्रालयात आंदोलन करण्यात येत आहे. मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर आंदोलकांनी उड्या मारुन आंदोलन केलं असल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी राज्यसरकारवर निशाण साधला आहे.

शासन आपल्या दारी म्हणणाऱ्यांना शेतकऱ्यांनी मंत्रालयात जाऊन आरसा दाखवल्याचं ट्वीट विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. तर आता शासन नेमकं कुणाच्या दारी? असा सवालही वडेट्टीवारांनी उपस्थित केला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com