Beed : बीडच्या पाणी टंचाईविरोधात ग्रामस्थ आक्रमक, हंडा- कळशी घेऊन ग्रामस्थ रस्त्यावर

बीड जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. बीड-परळी महामार्गावर रास्तारोको आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
Published by :
Dhanshree Shintre

बीड जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. बीडच्या दिंद्रुड येथे गत काही दिवसांपासून पाणीटंचाई जाणवत असून वारंवार मागणी करुनही प्रशासनाकडून टँकर सुरु केले जात नसल्याने गावातील महिला आणि ग्रामस्थ हंडे घेवून रस्त्यावर उतरले. बीड-परळी महामार्गावर रास्तारोको आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. गावात राबविण्यात आलेली जलजीवन योजनाही कागदावरच असून त्या येाजनेतून ग्रामस्थांची तहान भागत नसल्याने ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. तातडीने टँकर सुरु करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com