Virat Kohli
Virat KohliTeam Lokshahi

ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयानंतर कोहलीची मैदानात केली खास मजा-मस्ती, Video व्हायरल

चाहत्यांमध्ये व्हिडिओची चर्चा
Published on

भारताचा स्टार विराट कोहली हा मागील काही वर्षांपासून फॉर्ममध्ये नसल्याचे दिसून येत होते. मात्र, आशिया चषक स्पर्धेत त्याने अफगाणिस्तानसोबतच्या सामन्यात तडफदार शतक करत फॉर्म पुन्हा आणला. ऑस्ट्रेलीया विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात देखील त्याने उत्तम कामगिरी केली. या सामन्यात त्याच्या खेळासोबत एक गोष्ट आणखी चर्चित झाली, ती म्हणजे त्याची मजामस्ती

विराटने नुकत्याच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी20 मध्ये अर्धशतक ठोकलं आणि त्यानंतर मालिकेतील दमदार कामगिरीमुळे अवार्ड मिळला. त्यावेळी त्यानी मस्ती म्हणून अवार्डचा चेक मिळताच पळण्याचा प्रयत्न केला. त्याची ही गोष्ट चाहत्यांना खूप आवडली आहे. हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com