Vishwajeet Kadam : विश्वजित कदम यांचा काँग्रेसच्या बैठकीवर बहिष्कार, नाना पटोलेंना पत्र

सांगलीच्या जागेचा तिढा वाढला, काँग्रेस आमदार विश्वजीत कदम आक्रमक झाले आहेत.
Published by :
Dhanshree Shintre

सांगलीच्या जागेचा तिढा वाढला, काँग्रेस आमदार विश्वजीत कदम आक्रमक झाले आहेत. काँग्रेसच्या राज्य प्रचार निवड व बैठकीवर बहिष्काराचा आमदार विश्वजित कदम यांचा इशारा आहे. सांगलीच्या जागेचा तिढा सुटत नसल्याने विश्वजीत कदम यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र पाठवले.

विश्वजीत कदम यांची काँग्रेसच्या राज्य प्रचार समितीच्या सदस्य पदी 30 मार्च रोजी करण्यात निवड आली आहे. जोपर्यंत सांगली लोकसभेच्या जागेचा तिढा सुटत नाही, तोपर्यंत सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता व आमदार म्हणून मी बैठकीस अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे. 3 एप्रिल रोजी मुंबई मध्ये 1 वाजता होणाऱ्या प्रचार समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची आमदार कदम यांनी भूमिका दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com