जम्मू काश्मीर विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्याचं आज मतदान

जम्मू काश्मीर विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्याचं आज मतदान होत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

जम्मू काश्मीर विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्याचं आज मतदान होत आहे. 6 जिल्ह्यांतील 26 जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात मध्य काश्मीरमधील श्रीनगर, गंदरबल आणि बडगाम या तीन जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.

25 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. भाजप जम्मू-काश्मीर युनिटचे प्रमुख रविंदर रैना राजौरी जिल्ह्यातील नौशेरा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवत आहेत.

दुसऱ्या टप्प्यात पाच माजी मंत्री आणि दहा माजी आमदारही रिंगणात असून 26 जागांसाठी 239 उमेदवार मैदानात उतरले असल्याची माहिती मिळत आहेत.

यासोबतच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस, सशस्त्र पोलीस दल आणि केंद्रीय सशस्त्र निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com