Washim: वाशिम झेडपीच्या लेटलतिफ कर्मचाऱ्यांना दणका

वाशिम जिल्हा परिषदेचे सीईओ वैभव वाघमारे यांनी लेटलतिफ कर्मचाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे.
Published by :
Sakshi Patil

वाशिम जिल्हा परिषदेचे सीईओ वैभव वाघमारे यांनी लेटलतिफ कर्मचाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे. उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांनी थेट गेट बाहेरच ताटकळत उभे केलं. तसेच यावेळी परत उशिरा आल्यास कठोर कारवाई करणार असल्याची तंबीही दिली आहे.

सीईओ वैभव वाघमारेंनी उशिरा येणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी कार्यालयीन वेळ झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे तीनही गेट कुलूपबंद केले होते. यामुळे 50 हून अधिक कर्मचाऱ्यांना बाहेरच उभे राहवं लागलं होतं. सीईओंच्या या कृतीमुळे कर्मचाऱ्यांनी चांगलाच धसका घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com