Ramdas Athawale: शिर्डी लोकसभा जागेवरून रामदास आठवले काय म्हणाले?

मी भाजपच्या चिन्हावर लढणार नाही. आम्हाला लोकसभेसाठी जागा द्यावी हा आमचा आग्रह आहे, असं रामदास आठवले म्हणाले.
Published by :
Team Lokshahi

मी भाजपच्या चिन्हावर लढणार नाही. आम्हाला लोकसभेसाठी जागा द्यावी हा आमचा आग्रह आहे. भाजपने आम्हाला सिरियसली घ्यावे. मी युतीतून बाहेर पडणार नाही. आम्हाला जागा मिळणार आहे. आमचे नेते म्हातेकर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले आहेत. त्यांनी आमची भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवली आहे, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले म्हणाले.

रामदास आठवले यांनी शिर्डी आणि सोलापूर लोकसभेची जागा महायुतीकडे मागितली आहे. ते शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मी लवकरच पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करेन, असं रामदास आठवले म्हणाले.

महायुतीने मला लोकसभेची निवडणूक लढवू द्यावी. मी स्वत: शिर्डी लोकसभेमधून दोन वेळा खासदार झालो आहे. तिसऱ्यांदा मला हार पत्करावी लागली, पण मला परत आता शिर्डी लोकसभा निवडणुक लढवायची आहे, अशी इच्छा रामदास आठवले यांनी व्यक्त केली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com