Uddhav Thackeray on Abhishek Ghosalkar: अभिषेक घोसाळकर प्रकरणावर काय म्हणाले उद्धव ठाकरे?

आता त्याला बॉडीगार्ड ठेवण्याची वेळ का आली आणि बॉडीगार्ड कोण होता? पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मला वाटतं मिश्रा त्याचे नाव.
Published by :
Dhanshree Shintre

आता त्याला बॉडीगार्ड ठेवण्याची वेळ का आली आणि बॉडीगार्ड कोण होता? पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मला वाटतं मिश्रा त्याचे नाव. त्याच्या शस्त्रातून त्याने त्या गोळ्या चालवल्या. आता त्या गोळ्या खरंच त्यानी चालवल्या की आणखी कोणी चालवल्या आणि मग दोघांनाही मारण्याची सुपारी कोणीतरी दिली होती का? हा एक मोठा प्रश्न आपल्या मनामध्ये आहे. आम्ही राज्यपालांकडे काही जाणार नाही आहोत, कारण पुर्वीचे राज्यपाल होते ते एकदम जास्तच कर्तव्यदक्ष होते आणि ते कर्तव्यदक्ष म्हणजे ते कोश्यारी. त्यांच्याचबरोबर या गुंडांचा फोटो आहे. त्याचा सन्मान करतात आणि असे जर राज्यपालच्या हाताने गुंडांची सत्कार त्यांची पार्श्वभूमी न होता होत असतील, तर कोणाकडे दाद मागायची, कोणाकडे न्याय मागायचा. गेले काही दिवस जे मी म्हणालो त्याच्यामध्ये एक-दीड वर्षांपूर्वी गणपती बाप्पाच्या मिरवणूकीत एका आमदाराने गोळीबार केला. त्याच्यावर कोणती कारवाई झाली नाही. त्याला कदाचित क्लिनचीट सुद्धा दिली असेल. जिथे ही घटना घडली बोरिवली-दहीसर भागात तिथल्याच बाजूच्या आमदाराच्या मुलानी एका बिल्डर पुत्राचं अपहरण केलं होतं. त्याच्यावर काही कारवाई झाली नाही. खुलेआम ठाण्यामध्ये सुद्धा एका तरुणीवर गाडी चढवून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. तो सुद्धा भाजपचा कार्यकर्ता म्हटल्यावर त्याच्यावरही कारवाई झाली नाही. मी भारतरत्नबद्दल एवढेच बोलीन की स्वामीनाथन यांना जो भारतरत्न मिळाला आहे .याचा अर्थ मी असा लावतो जर सरकारमध्ये हिंमत असेल तर स्वामीनाथन या नावाची अंमलबजावणी त्यांनी करावी असे उद्धव ठाकरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com