Nikhil Wagle Attack : वागळेंवर हल्ला करणाऱ्यांना अटक कधी? राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया

जेष्ठ पत्रकार निखिल वागळेंवर हल्ला करण्यात आला. हल्ला भाजपच्या कार्यकर्त्यांकडून केला गेला असा निखिल वागळे यांचा आरोप आहे.
Published by :
Dhanshree Shintre

जेष्ठ पत्रकार निखिल वागळेंवर हल्ला करण्यात आला. हल्ला भाजपच्या कार्यकर्त्यांकडून केला गेला असा निखिल वागळे यांचा आरोप आहे. वागळेंवर हल्ला करणाऱ्यांना अटक कधी होणार? असा सवाल उपस्थित झाला आहे. पुण्यात कायद्याचं राज्य आहे का? मुळात पुणे पोलिसांना हल्ल्याची माहिती होती? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. निखिल वागळे आणि असिम सरोदे येत असलेल्या गाडीवर भाजपकडून अंडे फेकण्यात आली आहे. दरम्यान याबाबत खासदार संजय राऊत आणि चंद्रशेखर पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com