Nana Patole: नांदेड कुणा एकाचा बालेकिल्ला नाही, पटोले का म्हणाले असे?

अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश होताच, नांदेड भाजप शहर कार्यालयापासून महावीर चौकापर्यंत भाजप कार्यकर्त्यांनी रॅली काढली आहे.
Published by :
Team Lokshahi

अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि भाजप पक्षात प्रवेश केला.

अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश होताच, नांदेड भाजप शहर कार्यालयापासून महावीर चौकापर्यंत भाजप कार्यकर्त्यांनी रॅली काढली आहे. तर फटाक्यांची आतिषबाजी व घोषणा देत अशोक चव्हाण यांच्या भाजप पक्ष प्रवेशाचा जल्लोष केला आहे, यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

नाना पटोले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे त्यामुळे लक्षात घ्या. आता भाजपचे अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत"

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com