Sanjay Raut: गाडी बावनकुळेंच्या मुलाची, FIRमध्ये नाव का नाही? नागपूर कार अपघातावरून राऊतांचा हल्लाबोल

नागपूर कार अपघातावरून आता संजय राऊतांनी मोठा हल्लाबोल केला आहे.

नागपूर कार अपघातावरून आता संजय राऊतांनी मोठा हल्लाबोल केला आहे. अपघातामधील कारची नंबर प्लेट का काढली असा थेट सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. बावनकुळे कुटुंबाचा संबंध नाही तर लपवाछपवी कशाला असा थेट सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. गाडी बावनकुळेंच्या मुलाची मग एफआयआरमध्ये नाव का नाही? असा सवाल देखील राऊतांचा आहे. लाहोरी बारचं सीसीटीव्ही फुटेज गायब असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे. फडणवीस गृहमंत्री पदावर राहण्यास लायक नाही असं म्हणत त्यांनी गृहमंत्र्यांवर देखील हल्लाबोल केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com