Beed: बीड जिल्ह्यातील 260 शस्त्र परवाने रद्द होणार?

बीड जिल्ह्यातील 260 शस्त्र परवाने रद्द होण्याची शक्यता. गुन्हे नोंद असलेल्या 260 जणांवर कारवाई, जिल्हा प्रशासनाकडून परवाने रद्द करण्याची शक्यता.
Published by :
Prachi Nate

बीड जिल्ह्यातील 260 शस्त्र परवाने रद्द होण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यात 16 गुन्हे नोंद असलेल्याकडे शस्त्र परवाना असल्याचे समोर आले होते. शिवाय जिल्ह्यातील 260 जणांवर गुन्हा दाखल असून त्यांचा परवाना रद्द करण्याबाबत पोलीस प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवला होता.

मात्र जिल्हा प्रशासनाकडून हे परवाने रद्द करण्याकरता चालढकल केली जात होती. अखेर 26 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील गुन्हे नोंद असलेल्या तब्बल 260 जणांना नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे हे शस्त्र परवाने रद्द होणार असल्याचे दिसत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com