Ram Shinde यांच्या पत्रामुळे Rohit Pawar यांच्या अडचणी वाढणार? बारामती अग्रो विरोधात शेतकरी आक्रमक

राम शिंदे यांच्या पत्रामुळे रोहित पवारांच्या अडचणी वाढणार का? बारामती अॅग्रो विरोधात शेतकरी आक्रमक, स्थानिकांच्या आरोग्य आणि शेतीचे प्रश्न ऐरणीवर.
Published by :
shweta walge

विधान परिषदेचे सभापती राम शिदेंच्या पत्रामुळे रोहित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. बारामती अॅग्रो साखर कारखान्यामुळे स्थानिकांच्या आरोग्यासह शेती धोक्यात आल्याचं निवेदन शेतक-यांनी राम शिंदेंना दिलं. त्यांनी तात्काळ महाराष्ट्र प्रदुषण मंडळाला या प्रकरणाची चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश दिलेत. मात्र, महाराष्ट्र प्रदूषण महामंडळानं कारखाना बंद झाल्यावर प्रदूषण चाचणी करण्यासाठी यंत्रणा पाठवल्यानं वराती मागून घोडं असाच प्रकार केल्याचा आरोप शेतक-यांनी केलाय. मात्र राम शिंदे नक्कीच न्याय देतील असा विश्वासही शेतक-यांनी व्यक्ते केलाय.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com