व्हिडिओ
'पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते मला ब्लॅकमेल करतात' ; Yashomati Thakur यांचा खळबळजनक आरोप
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते मला ब्लॅकमेल करत असून 25 लाखाची मागणी करत असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसच्या नेत्या आणि विधानसभेच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते मला ब्लॅकमेल करत असून 25 लाखाची मागणी करत असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसच्या नेत्या आणि विधानसभेच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांनी केला आहे. यशोमती ठाकूर यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या असून महाविकास आघाडीमध्येच वादंग रंगण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस सुनील वऱ्हाडे यांनी मला 25 लाख रुपयांची मागणी करत ब्लॅकमेल केलं असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस नेत्या व तिवसा मतदार संघाच्या मविआच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांनी केला आहे.