Yashomati Thakur: "महाराष्ट्रधर्माला तडा गेला तर... आम्ही अजून जिवंत आहोत"- यशोमती ठाकूर

यशोमती ठाकूर यांनी महाराष्ट्रधर्माला तडा गेल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. जातिवाद आणि समाज विभाजनावर टीका करत, संविधानाच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
Published by :
Team Lokshahi

माजी मंत्री व काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी सरकारवर हल्लाबोल करत एक मोठा इशारा दिला, महाराष्ट्र धर्माला तळा गेला तर आम्ही रस्त्यावर उतरू कारण सध्या जातिवाद केला जातोय व समाजा समाजामध्ये विभाजन केलं जात आहे, दादागिरी करून निवडणूक जिंकल्या जात आहे, आम्ही त्याच्या पलिकडे आहोत आमच्यासाठी आमच्यासाठी आमचा देश आमचा संविधान हे महत्त्वाचं आहे. या संविधानाच्या सुरक्षेसाठी हे सविधान एकत्रित राहिलं पाहिजे हा समाज बळकट राहिला पाहिजे म्हणून आपण कटिबद्ध आहोत.

त्यांनी महाराष्ट्रधर्म सांभाळावा- यशोमती ठाकूर यांचा महायुतीला इशारा

हे लोक एक मॅल प्रॅक्टीस करून सत्तेत आलेले आहेत. त्यांच अभिनंदन त्यांनी महाराष्ट्र जपावा त्यांनी महाराष्ट्र धर्म सांभाळावा. अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. महाराष्ट्र धर्माला जर तडा गेला तर आम्ही जिवंत आहोत आम्ही मेलो नाही, आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रधर्म सांभाळावा असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला.

मारकटवाडीत बॅलेट पेपरवर का मतदान होऊ दिलं नाही?- यशोमती ठाकूर यांचा महायुतीला प्रश्न

तर मारकटवाडीत बॅलेट पेपरवर का मतदान होऊ दिलं नाही? चोरी केली नाही तर भीती कशाला असा प्रश्न देखील यशोमती ठाकूर यांनी महायुतीला केला आहे, तसेच आगामी काळात काँग्रेस नेते राहुल गांधी मारकटवाडीतून लॉंग मार्चकाढून संविधान व लोकशाहीच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरणार आहे अशी माहिती काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर यांनी दिली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com