Yavatmal : अर्ज न करताही लाडकी बहीण योजनेचे पैसे भावाला; जाफर शेख नावाच्या तरुणाच्या खात्यात पैसे

अर्ज न करताही लाडकी बहीण योजनेचे पैसे भावाला मिळत असल्याच समोर आलं आहे. यवतमाळच्या जाफर शेख नावाच्या तरुणाच्या खात्यात पैसे आले आहेत.
Published by :
Team Lokshahi

अर्ज न करताही लाडकी बहीण योजनेचे पैसे भावाला मिळत असल्याच समोर आलं आहे. यवतमाळच्या जाफर शेख नावाच्या तरुणाच्या खात्यात पैसे आले आहेत, लाडकी बहीण योजनेचे पैसे लाडक्या भावाला कसे? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. सरकारी पातळीवर आता अनागोंदी कारभार आता समोर येत आहे.

लाडकी बहीण योजनेचे पैसे तरुणाच्या खात्यात जमा झालेत. महिलांसाठी सुरु झालेल्या योजनेचे पैसे चक्क एका पुरुषाच्या खात्यात जमा झाले आहेत. यादरम्यान विशेष म्हणजे या तरुणाने कोणताच अर्ज भरला होता ना कोणती कागदपत्रे होती, तरी ही या तरुणाच्या खात्यात 3000 रुपये जमा झाले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com