Pune Gangster Parade : काल टोळ्यांचे म्होरके, आज ड्रग्स पेडलर, गुन्हेगारांची पुणे पोलिसांसमोर वरात!

पुणे शहरात गांजा ड्रग आणि बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या तब्बल 500 पेक्षा अधिक गुन्हेगारांची पोलीस आयुक्तांनी कार्यालयात ओळख परेड सुरु आहे.
Published by :
Dhanshree Shintre

पुणे शहरात गांजा ड्रग आणि बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या तब्बल 500 पेक्षा अधिक गुन्हेगारांची पोलीस आयुक्तांनी कार्यालयात ओळख परेड सुरु आहे. शहरातील कुख्यात गुंडाची काल ओळख परेड झाल्यानंतर शहरांमध्ये बेकायदेशीर रित्या पिस्टल ड्रग्स आणि गांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची पुण्यातील आयुक्त कार्यालयात ओळख परेड सुरू आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे पोलीस आयुक्त पदांचा पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील 30 पोलीस स्टेशनच्या हद्दीत अमली पदार्थ पिस्टल आणि अवैध व्यवसाय करणाऱ्या गुन्हेगारांची ओळख परेड सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com