व्हिडिओ
Solapur| खड्ड्यांच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन
सोलापुरात खड्ड्यांच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने अनोखं आंदोलन केल आहे
सोलापुर: पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडल्याचे दिसते. सोलापुरात खड्ड्यांच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने अनोखं आंदोलन केल आहे. खड्ड्यांमुळे नागरिकांच्या हाडांची चाळण झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. यावेळी सोलापुरातील रस्त्यांचे खड्डे हे अंतराळातील खड्डे असल्याचे दर्शवत आंदोलन करण्यात आले आहे. अंतराळवीरांचा पोशाख घालून रस्त्यावरील खड्ड्यात बसत युवकांकडून अनोखे आंदोलन केले.
रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेकांचा जीव गेल्याचा आरोप आंदोलकांनी केला असून रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे शासनाचा करोडो रुपयांचा निधी पाण्यात गेल्याचा देखील करण्यात आला आरोप आंदोलकांनी केला आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.