Pune : तलाठी भरती घोटाळा प्रकरणी युवक काँग्रेसचं आंदोलन; जोरदार घोषणाबाजी

पुण्यामध्ये युवा काँग्रेसचं आंदोलन बघायला मिळत आहे. तलाठी भरती घोटाळा प्रकरणी आंदोलन केलं जात आहे.
Published by :
Team Lokshahi

 राज्यभरामध्ये तलाठी भरतीच्या परीक्षेचा निकाल लागला. परंतु, पहिली गुणवत्ता यादी वादात अडकली आहे. याविरोधात पुण्यामध्ये बालगंधर्व चौकात युवा काँग्रेसने आंदोलन केले आहे. तलाठी भरती घोटाळा प्रकरणी आंदोलन केलं गेले आहे. यावेळी युवा काँग्रेसकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच, तलाठी घोटाळ्याची एसआयटी चौकशी करण्याची मागणीदेखील करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी युवा काँग्रेस आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com