Zeeshan Siddiqui: झिशान सिद्दीकींना अजित पवारांसोबत फ्रंट सीटवर स्थान; वर्षा गायकवाडांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेत झिशान सिद्दीकींना मानाचं स्थान मिळालं आहे. झिशान सिद्दीकींना अजित पवारांसोबत फ्रंट सीटवर स्थान मिळालं आहे.
Published by :
Team Lokshahi

राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेत झिशान सिद्दीकींना मानाचं स्थान मिळालं आहे. झिशान सिद्दीकींना अजित पवारांसोबत फ्रंट सीटवर स्थान मिळालं आहे. झिशान सिद्दीकींना राष्ट्रवादीमध्ये अधिकृत प्रवेश आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. झिशान सिद्दीकींनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली का असा देखील प्रश्न समोर आला आहे.

यापार्श्वभूमीवर वर्षा गायकवाडांची प्रतिक्रिया देत म्हणाल्या, झिशान सिद्दीकी आमच्या पक्षात नाहीत, ते कधीच अजित पवारांच्या गटात गेले आहेत. हे तर त्यांनी उघड सांगितल होत मग आम्हाला का प्रश्न विचारत आहात. ते गेले पक्ष सोडून आणि जिथे ते गेले तिथे त्यांनी सुखी राहाव. आमच्या पक्षाने आता ठरवलेल आहे जे पक्ष सोडून जातील त्यांनी तिथेच राहाव. आम्हाला त्यांच्याबद्दल काही ही बोलायचं नाही. प्रश्न राहिला आमच्या पक्षाचा आमच्या पक्षाने निर्णय घेतला आहे येणाऱ्या काळात उमेदवार करू आणि निवडून आणू, असं म्हणत वर्षा गायकवाडां आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com