Zika Virus : पुणे शहरात झिकाचा धोका वाढतोय; तीन रुग्ण आढळले

पुणे शहरात झिकाचा धोका वाढत चालला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

पुणे शहरात झिकाचा धोका वाढत चालला आहे. पुणे शहरात एरंडवणा आणि मुंढव्यात झिकाचे तीन रुग्ण आढळल्याची माहिती मिळत आहे. रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 20 जणांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

या परिसरातील 2 हजार 422 घरांचे सर्वेक्षण केले असल्याची माहिती मिळत आहे. वारी सुरु होते आहे याच पालखी पुण्यात येत असताना त्याच्याआधी झिकाचा धोका पुण्यामध्ये वाढत आहे. झिका रूग्ण आढळल्याने पुणेकरांची चिंता वाढली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com