विधानसभा निवडणूक 2024
माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या सिध्दी कदमची उमेदवारी रद्द
निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे.
अभिराज उबाळे, पंढरपूर
निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सिध्दी रमेश कदम यांना उमेदवारी दिली होती. मात्र आता ही उमेदवारी रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सिध्दी कदम यांच्या उमेदवारीला विरोध करत उमेदवार बदलण्याची मागणी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सिद्धी कदम यांना दिलेला एबी फॉर्म रद्द करावा असे पत्र निवडणूक आयोगाला दिले आहे.