कोकण
Uddhav Thackeray : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात 'या' तारखेला उद्धव ठाकरेंची जाहीर सभा
निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे.
निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर उदय सामंतांच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडणार आहे.
रत्नागिरीत 5 नोव्हेंबरला उद्धव ठाकरेंची जाहीर सभा पार पडणार आहे. राजन साळवी यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे रत्नागिरीत येणार असून या जाहीर सभेतून उद्धव ठाकरे काय बोलणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.