भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर; पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 'या' 40 नेत्यांच्या समावेश
निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.
20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आता भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 40 नेत्यांच्या समावेश आहे.
भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, अशोक चव्हाण,पंकजा मुंडे, मुरलीधर मोहोळ असणार असून उत्तर भारतीय मतांसाठी युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ही महाराष्ट्रात प्रचार करणार असल्याचे तसेच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भूपेंद्रभाई पटेल, भजनलाल शर्मा, मोहन यादव व इतर राज्यांचे मुख्यमंत्रीही महाराष्ट्रात प्रचार करणार असल्याची माहिती मिळत आहे.