मनसेचं ठरलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात उमेदवार देणार नाहीत, कारण समोर

मनसेचं ठरलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात उमेदवार देणार नाहीत, कारण समोर

मनसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उमेदवार देणार नाहीत, मैत्रीपूर्ण संबंधांमुळे निर्णय; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी.
Published by :
shweta walge
Published on

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वंच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. सर्व पक्षाकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत. यातच आता मोठी बातमी समोर आली आहे. मनसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मनसे उमेदवार देणार नसल्याची माहिती समोर आली आहे. कोपरी पाचपाखाडी मतदार संघात अभिजित पानसे यांची उमेदवारी निश्चित झाली होती, मात्र आता उमेदवारी न देण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे.

एकनाथ शिंदेंशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान अमित ठाकरे यांच्या विरोधात शिवसेनेने सदा सरवणकर यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. ठाण्यात, ठाणे शहर मतदारसंघातून अविनाश जाधव, ओवळा माजिवडा इथून संदीप पाचांगे आणि कळवा मुंब्रा इथून सुशांत सूर्यराव हे उमेदवार विधानसभा निवडणूक लढणार आहेत.

दरम्यान, आता हीच मैत्री निभावून एकनाथ शिंदेही माहिम विधानसभा मतदारसंघातून आपले उमेदवार आणि विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना माघार घेण्यास सांगणार का, याची उत्सुकता आहे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com