Hemant Rasne Wins in Kasba Peth
Hemant Rasne Wins in Kasba Peth

Hemant Rasane Wins In Kasba: कसब्यात धंगेकरांना मोठा धक्का, हेमंत रासने विजयी

कसब्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. रविंद्र धंगेकर यांना पराभवाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. भाजपकडून रिंगणात असलेले हेमंत रासने विजयी झाले आहेत.
Published by :
Team Lokshahi
Published on

कसब्यामध्ये भाजपचे उमेदवार हेमंत रासने आघाडीवर आहेत. हेमंत रासने यांना 35487 मते मिळाली आहेत. तर रविंद्र धंगेकर यांना 22747 मते मिळाली आहेत. ही सातव्या फेरीतील मतांची संख्या आहे. एकूण २० मतमोजणीच्या फेऱ्या आहेत.

पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे कसब्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विरुद्ध हेमंत रासने अशी लढत पाहायला मिळाली. अडीच वर्षापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत गमाविलेला कसबा मतदारसंघ भाजपने पुन्हा काबीज केला आहे.

कसबा पेठेतून मविआचे उमेदवार म्हणून रविंद्र धंगेकर यांनी हेमंत रासने यांचा पोटनिवडणुकीत पराभव केला होता. आता त्याच मतदारसंघात काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांना तर भाजपकडून पुन्हा एकदा हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केल्यानं कसब्यात पुन्हा रविंद्र धंगेकर विरुद्ध हेमंत रासने अशी लढत पाहायला मिळाली.

भाजपचा बालेकिल्ला अशी एकेकाळी ओळख असलेल्या कसबा मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे आमदार होते. कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी अडीच वर्षापूर्वी येथे पोटनिवडणूक झाली होती. त्यावेळी भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत ब्राह्मण उमेदवार न दिल्याने नाराज झालेला मतदार मतदानासाठी बाहेर पडला नाही त्यामुळे काँग्रेसचे धंगेकर येथून आमदार म्हणून निवडून आले. मात्र, विधानसभा निवडणुकीत हेमंत रासने विजयी झाले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com