Mumbai
Sanjay Raut : माहिम मतदारसंघाबाबत संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
माहिम मतदारसंघाबाबत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माहिम मतदारसंघाबाबत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, दादर माहिम मतदारसंघात यशवंतराव चव्हाण किंवा पंडित नेहरु निवडणूक लढत नाही आहेत. हे लक्षात घ्या तुम्ही. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पक्षाचे उमेदवार लढत असतात. अनेक नेत्यांची मुलं निवडणूक लढत आहेत.
तुम्हाला राजकारणात करिअर करायचं असेल तर तुम्हाला निवडणूक लढावीच लागते. मग माझे वडिल कोण आहेत, माझी आई कोण आहे, माझे आजोबा कोण आहेत याचा विचार न करता तुम्हाला निवडणुकीत उतरावं लागते. तुम्ही त्याचा फार बावू करु नका.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, हे राज्य फार मोठं आहे. आमच्या पक्षात आम्ही जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते माननीय उद्धव ठाकरे साहेब घेतील. असे संजय राऊत म्हणाले.