Vidhansabha Election
MVA Candidate List: 'मविआ'च्या 'त्या' 100 उमेदवारांची नावे जाहीर होणार ?
मविआच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे. मविआची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. मविआच्या 100 उमेदवारांची नावे जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
मविआच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे. मविआची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. मविआच्या 100 उमेदवारांची नावे जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. मविआची तब्बल 9 तासांची अशी बैठक झाली होती. विदर्भ, मुंबईसह राज्यातील काही जागांवर अद्याप ही तिढा आहे. तर शरद पवारांची राष्ट्रवादी 85 जागांवर लढण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील जागांसाठी ठाकरे आणि कॉंग्रेसमध्ये रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेत विदर्भातील 14 जागांसाठी मागणी आहे. मात्र कॉंग्रेस विदर्भातील जास्तीत जास्त जागा लढण्यावर ठाव असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच काही जागांवर तिढा असल्या कारणांमुळे उमेदवार घोषित करण्यामध्ये मोठी अडचण निर्माण झालेली आहे. त्यामुळे आता जागांच्या संदर्भात असणाऱ्या समस्येचे निवारण होणार का हे पाहण आता महत्त्वाचं ठरणार आहे.