Pune Ujjwal Nikam: पुण्यात भाजपला मोठा धक्का! उज्ज्वल केसकरांचा स्वराज्य पक्षात प्रवेश

Pune Ujjwal Nikam: पुण्यात भाजपला मोठा धक्का! उज्ज्वल केसकरांचा स्वराज्य पक्षात प्रवेश

पुण्यात भाजपला मोठा धक्का मिळणार आहे, माजी नगरसेवक उज्ज्वल केसकरांचा स्वराज्य पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Published on

उज्वल केसकर भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. अशातच पुण्यात भाजपला मोठा धक्का मिळणार आहे, भाजपचे माजी नगरसेवक उज्वल केसकर यांनी स्वराज्य कार्यालयात संभाजीराजे यांची भेट घेतली. ही भेट राजकीय असल्याची खात्रीशीर माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. माजी नगरसेवक उज्ज्वल केसकरांचा स्वराज्य पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचसोबत उज्वल केसकर स्वराज्य पक्षाकडून कोथरूड मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा समोर आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com