Ravindra Dhangekar : कसबा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अनेक बैठका होत आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.
याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपली 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये कसबा मतदारसंघातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यावर माध्यमांशी बोलताना रविंद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रविंद्र धंगेकर म्हणाले की, मी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, नेते, यांचे मनापासून आभार मानतो. गेल्या दीड वर्षात मला तीनवेळा पक्षाने जबाबदारी दिली. मी पक्षाचे मनापासून आभारी आहे. आज महाराष्ट्राचे प्रश्न आहेत. बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, युवकाचं प्रश्न, गुन्हेगारीचे प्रश्न आहेत.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, प्रामुख्याने माझं पुणे चांगलं राहिले पाहिजे. हा मुद्दा महत्वाचा आहे. प्रचंड प्रमाणामध्ये आज पुणेकरांना ज्या यातनेतून जावं लागते आहे. त्याची सुटका करण्यासाठी पुणेकरांनी मला आशीर्वाद द्यावेत. असे रविंद्र धंगेकर म्हणाले.