विधानसभा निवडणूक 2024
Sharad Pawar Candidate List: शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर, जयंत पाटील रिंगणात
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर जाहीर करण्यात आली आहे. यानुसार इस्लामपुरातून जयंत पाटील रिंगणात उतरले आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर जाहीर करण्यात आली आहे. यानुसार इस्लामपुरातून जयंत पाटील रिंगणात उतरले आहेत. आज पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच स्वत:च्या नावाची घोषणाही त्यांनी यावेळी केली आहे. दरम्यान ही पहिली यादी असून दुसरी यादी पुढील दोन दिवसांमध्ये दुसरी जाहीर करणार असल्याचे म्हणाले.