विधानसभा निवडणूक 2024
राज्यातील 47 मतदारसंघांत शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना रंगणार
विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
थोडक्यात...
राज्यात 47 मतदारसंघांत शिवसेना विरुद्ध शिवसेना
47 मतदारसंघात मशाल-धनुष्यबाणाचा सामना
मुंबईत 12 ठिकाणी चुरशीचा सामना
विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखा जाहीर असून निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे.
20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना फुटीनंतर विधानसभा निवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना 47 मतदारसंघांत रंगणार आहे.
यातच 12 ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांपैकी 47 विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळणार असून या लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.