Shreenivas Vanga Not reachable
Vidhansabha Election
आमदार श्रीनिवास वनगा मागील 24 तासांपासून नॉट रिचेबल
तिकीट नाकारल्याने नाराज झालेले पालघरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा मागील 24 तासांपासून नॉट रिचेबल आहेत. घरातून निघतानाच वनगा यांनी आपले दोन्ही फोन स्विच ऑफ केले असून त्यांचा सध्या त्यांच्या कुटुंबीयांसोबत देखील संपर्क झालेला नाही.
तिकीट नाकारल्याने नाराज झालेले पालघरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा मागील 24 तासांपासून नॉट रिचेबल आहेत. घरातून निघतानाच वनगा यांनी आपले दोन्ही फोन स्विच ऑफ केले असून त्यांचा सध्या त्यांच्या कुटुंबीयांसोबत देखील संपर्क झालेला नाही. त्यामुळे सध्या वनगा कुटुंबीय मोठ्या चिंतेत आहेत.
आज दिवसभर विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह वनगा यांच्या नातेवाईकने देखील वनगा कुटुंबाची भेट घेतली त्यांना सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, श्रीनिवास वनगा नेमके कुठे आणि कोणासोबत आहेत. हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे वनगा कुटुंबीयांसह पोलीस प्रशासनाकडून सध्या त्यांचा तपास केला जात आहे.