Shrinivas Vanga: अखेर आमदार श्रीनिवास वनगा अज्ञातवासातून घरी परतले

Shrinivas Vanga: अखेर आमदार श्रीनिवास वनगा अज्ञातवासातून घरी परतले

आमदार श्रीनिवास वनगा तब्बल चार दिवसांनंतर घरी परतले आहेत. श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी नाकारल्यामुळे वनगा नाराज झाले होते.
Published by :
Team Lokshahi
Published on

थोडक्यात जाणून घ्या,

आमदार श्रीनिवास वनगा तब्बल चार दिवसांनंतर परतले घरी.

श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी नाकारल्यामुळे वनगा नाराज.

उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज झालेले वनगा हे अज्ञातस्थानी गेले निघून .

आमदार श्रीनिवास वनगा तब्बल चार दिवसांनंतर घरी परतले आहेत. श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी नाकारल्यामुळे वनगा नाराज झाले होते. पालघरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा हे चार दिवसांआधी नॉट रिचेबल लागत होते. उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज झालेले वनगा हे अज्ञातस्थानी निघून गेले होते. त्यानंतर ते काही वेळाने घरी देखील आले घरच्यांसोबत बातचित करुन पुन्हा ते अज्ञातस्थानी निघून गेले होते आता चार दिवसांनी पुन्हा घरी आले आहेत.

वनगा घरातून अचानक निघून गेल्यामुळे त्यांचे कुटुंबीय मोठ्या चिंतेत पडले पाहायला मिळाले होते. यादरम्यान त्यांच्या कुटुंबीयांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला होता त्यावेळी असं समजल होत की, शिंदेंकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती याच गोष्टीला नाराज होऊन नैराश्यात त्यांनी घर सोडल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पालघरमधून राजेंद्र गावितांना उमेदवारी देण्यात आली होती.

त्यामुळे शिंदेंसोबत गेलेले श्रीनिवास वनगा नाराज झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे श्रीनिवास वनगा यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं होत. त्यादरम्यान श्रीनिवास वनगा म्हणाले देखील होते की, उद्धव ठाकरे आमच्यासाठी देव होते, असं म्हणत त्यांचा अश्रूंचा बांध फुटला होता आणि आता अखेर श्रीनिवास वनगा त्यांच्या अज्ञातवासातून घरी परतले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com