Srinivas Vanaga Not Reacheble: श्रीनिवास वनगा मागील बारा तासांपासून नॉट रिचेबल

Srinivas Vanaga Not Reacheble: श्रीनिवास वनगा मागील बारा तासांपासून नॉट रिचेबल

पालघरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा मागील बारा तासांपासून नॉट रिचेबल आहेत. यामुळे त्यांचे कुटुंबीय मोठ्या चिंतेत पडले आहेत.
Published by :
Team Lokshahi
Published on

विधानसभा निवडणूका अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. तर त्यादरम्यान पक्षांच्या यादी जाहीर केल्या जात आहेत आणि उमेदवारांकडून आता अर्ज देखील दाखल केले जात आहेत. अशातच आता पालघरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा मागील बारा तासांपासून नॉट रिचेबल आहेत. यामुळे त्यांचे कुटुंबीय मोठ्या चिंतेत पडले आहेत. वनगा यांचे दोन्ही फोन बंद असल्याने कुटुंबीयांसह पोलीस प्रशासनाकडून वनगांचा शोध सुरू आहे. तर घरातून अचानक निघून गेलेले वनगा अजूनही घरी परतले नाही.

यादरम्यान त्यांच्या कुटुंबीयांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पालघरमधून राजेंद्र गावितांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे शिंदेंसोबत गेलेले श्रीनिवास वनगा नाराज झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे श्रीनिवास वनगा यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. त्यादरम्यान श्रीनिवास वनगा म्हणाले, उद्धव ठाकरे आमच्यासाठी देव होते असं म्हणत त्यांचा अश्रूंचा बांध फुटला. तसेच ठाकरेंकडून देखील श्रीनिवास वनगा यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com