Vidhansabha Election
भाजपनंतर आज शिवसेनेची पहिली उमेदवारी यादी जाहीर होण्याची शक्यता; 50 उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार?
विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.
भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. या यादीत 99 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आज शिवसेनेची पहिली उमेदवारी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
सकाळी 11 वाजेपर्यंत शिवसेनेची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता असून शिवसेनेच्या 50 उमेदवारांची नावे घोषित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या मुळे आता कोणाला संधी मिळते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.