VidhanSabha Elections UBT: ठाकरे गटाकडून अजित पवारांना मोठा धक्का!ठाकरे गटात इनकमिंगला सुरुवात
कोकणातून भाजपला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मोठा धक्का बसला आहे. कारण कोकणातील भाजपचे नेते राजन तेली हे ठाकरे गटात पक्ष प्रवेश केला आहे. त्यामुळे कोकणात राजन तेली विरुद्ध दीपक केसरकर यांच्यात लढत होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर राजन तेली यांच्या ठाकरेंच्या गटात प्रवेशामुळे भाजप आणि नारायण राणे यांना मोठा धक्का बसला आहे. त्याचसोबत अजित पवार गटाला ठाकरे गटाकडून मोठा धक्का कारण सांगोल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
अजित पवार गटाचे दीपक आबा साळुंखे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश केला आहे. या वेळेला दीपक आबा साळुंखे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का देण्याचा काम केलं आहे. तर सांगोला मतदारसंघात विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील असल्यामुळे ही जागा शिंदे गटाला जात असल्यामुळे दीपक आबा साळुंखे हे ठाकरे गटात जाऊन आमदारकीचे दावेदार ठरणार आहेत. आता सांगोल्यातून शहाजीबापू पाटील यांच्याविरोधात आमने सामने ठाकरेंच्या गटातून दीपक आबा साळुंखे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.