Vijay Wadettiwar : जनता मला नक्की आशीर्वाद देईल आणि प्रचंड बहुमतांनी विजयी करेल
राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आज ब्रम्हपुरी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. यावेळी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल उपस्थित असणार आहेत. मोठे शक्तिप्रदर्शन यानिमित्ताने केले जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ब्रम्हपुरी मतदारसंघातील जनतेचा आशीर्वाद आणि जनतेचा विश्वास आणि विकासाला साथ यामुळे मला विधानसभा क्षेत्रातील तिसरी लढाई अत्यंत सोपी वाटते, मी निवडणूक लढतो ती केवळ निवडणूक लढायची म्हणून लढत नाही. तर मी मतदारांच्या विश्वासाला पात्र ठरलो तर निवडणुकीला सामोरे जात असतो.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, मी केलेला विकास, करोडे रुपये आणलेले निधी आणि जनतेच्या सुख, दुख:चा साथीदार म्हणून जे केलेलं काम आहे त्यामुळे जनता मला नक्की आशीर्वाद देईल आणि प्रचंड बहुमतांनी मला विजयी करेल हा मला विश्वास आहे. सर्वसमाजासाठी लढणारा मी ओबीसी आहे. त्यामुळे मला कोण उमेदवार आहे याची मला काही चिंता वाटत नाही. बंडखोरी होण्याची शक्यता आमच्याकडे फार कमी आहे. पण झालीच तर आमच्या हायकंमाडने विभागवार काही नेत्यांना जबाबदारी दिलेली आहे. असे विजय वडेट्टीवार म्हणाले.