हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही रेल्वेमध्ये चहा प्यायचा की नाही याचा विचार कराल
सोशल मीडियात व्हायरल झालेल्या एक व्हिडीओतून रेल्वेत किंवा रेल्वे स्टेशनवर मिळणाऱ्या चहाबाबत किळसवाणा प्रकार समोर आला आहे. चहा हा सर्वाचा जिव्हाळाचा विषय.चहाशिवाय लोकांची सकाळसुरू होत नाही. सकाळच्या गडबडीत चहा पिण्यासाठी वेळ मिळत नाही, त्यांमुळे टपरीवरती, दुकानात किंवा रेल्वे स्टेशनवर चहा पितो. पण तुम्हाला माहिती आहे का? रेल्वेचा १० रुपयांचा चहा कसल्या गलिच्छ प्रकारे बनावला जातो. तुम्ही जर व्हिडिओ बघतलाना तर तुमचे चहा पिण्याचे मन उडून जाईल, तुम्ही चहा पिणं सोडून द्याल.
हिवाळासुरु झाला की, प्रत्येकजण ट्रिपचा प्लॅन करतो. कमी खर्चासाठी उत्तम पर्याय म्हणजे रेल्वे. ट्रेनच्या गप्पा गोष्टी आणि त्या गंमतीमध्ये झोप येऊ नये, म्हणून घेतला जातो तो रेल्वे चहा.
चहा विकणाऱ्यांच्या अनोख्या शैलीमुळे प्रवासी आकर्षित होतात. मात्र, हा चहा कसा बनवला जातो, हे बघितल्यानंतर तुम्हालाही किळसवाणं वाटेल. याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
पहाचं तुम्ही व्हिडिओ
कसा बनवतात रेल्वेचा चहा
इंस्टाग्राम पोस्टवरच्या व्हिडिओत रेल्वेमधल्या गार्ड कोचमध्ये अंघोळीचे पाणी तापवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हिटरने चहासाठी लागणारे पाणी गरम करताना दिसत आहे, दुसऱ्याबाजूला विकत आणलेला चहा गरम केलेल्या पाण्यामध्ये मिक्स करताना पाहायला मिळते आहे. म्हणजेच कमी चहामध्ये भरपूर पाणी असल्याचे समोर येते. तब्बल 11 सेकंदाच्या व्हिडीओमुळे नेटकऱ्यांची झोप उडाली आहे, या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत कमेंटचा पाऊस पाडला आहे. रेल्वेत मिळणारा हा दहा रुपयांचा चहा तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतो.
Disclaimer: या व्हिडीओची सत्यता 'लोकशाही'ने पडताळलेली नाही. या व्हिडीओबाबत 'लोकशाही' मराठी कोणताही दावा करत नाही.