OMG! AIच्या मदतीने तरुणीने प्रियकराची पकडली लफडी, अनेक दिवसांपासून होता संशय, VIDEO
आजच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर खूप वाढू लागला आहे. एआयच्या मदतीने बरेच काम केले जात आहे. अलीकडेच एका महिलेने एआयच्या मदतीने केलेल्या कामाचे परिणाम पाहून तुम्ही आर्श्चयचकित व्हाल.
खरं तर, 22 वर्षीय मिया डिओला तिच्या प्रियकर बिलीवर बऱ्याच दिवसांपासून संशय होता कारण तो विचित्र वागतो. मियाला वाटले की बिली तिच्यापासून काहीतरी लपवत आहे आणि तिला फसवत आहे. अशा परिस्थितीत मियाने खरं जाणून घेण्यासाठी एआयचा आधार घेतला. याचाच व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करुन तिन् टिकटॉकवरही शेअर केले आहे.
टिकटिकवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मिया मेलबॉक्समधून बिलीचा आवाज कॉपी करते आणि एआयच्या मदतीने तोच आवाज क्लोन करते आणि त्याच्या एका मित्राला कॉल करते असे दिसते. तो बिली नाही याची बिलीच्या मित्राला अजिबात कल्पना नाही.
बिलीच्या आवाजात AI मित्राला विचारतो की मी काल दारू प्यायलो होतो, मला वाटतं मी गडबड केली, मी काय केलं? उत्तरात मित्राने सांगितले की, तू पार्टीमध्ये खूप मद्यधुंद झाला होता आणि तू एका मुलीला किस केले. हे ऐकून मियाला धक्का बसला कारण तिचा प्रियकर तिला खरच फसवत होता.
मियाच्या या व्हिडिओवर लोकांनी खूप कमेंट केल्या.