Nagpur Police Viral Video : नियमांची आठवण करून दिल्याने पोलीस कर्मचाऱ्याला राग अनावर, पुढे जे झाल ते...; व्हिडीओ व्हायरल
नागपुरात वाहन चालवताना नियम सर्वसामान्यांसाठीच का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय, एका व्हायरल व्हिडीओमुळे हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याला एका बाईकस्वारानं हेल्मेट बाबत प्रश्न विचारला. त्यावेळी त्या पोलीस कर्मचाऱ्यानं प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तिला थांबवलं आणि त्याच्या कानशिलात लगावल्याचं व्हिडीओत दिसत आहे. दात दुखत असल्याचं पोलीस कर्मचाऱ्यानं सांगितलं. मात्र पुन्हा गाडीवर बसून जाताना पोलीस कर्मचाऱ्यानं हेल्मेट घातलं असता पुन्हा त्याला प्रश्न विचारल्यावर त्यानं पुन्हा हेल्मेट काढलं.
नेमकं काय घडलं ?
पोलीस कर्मचारी दुचाकीवरून जातांना एकाने व्हिडीओ काढत पोलीस कर्मचाऱ्यास हेल्मेट का घातले नाही असा प्रश्न विचारला? मात्र पोलीस कर्मचाऱ्याने शिवीगाळ केल्याचा आरोप करत व्हिडीओ काढणाऱ्याचा कानशिलात लगावली. पोलीस कर्मचाऱ्यांला नियमांची आठवण करून दिल्याने राग अनावर झाल्याचं प्रकार आला समोर आला आहे. नागपुरातील जरीपटका ते मानकापूर भागातून जातानाचा हा व्हिडीओ असल्याची माहिती समोर येतं आहे. सदर व्हिडीओ हा नागपूरमधील असल्याचं समोर येत आहे. मात्र लोकशाही मराठी या व्हिडीओची पुष्टी करत नाही.