सीमा हैदर आणि सचिनची 'गदर लव्हस्टोरी'; पाकिस्तानी नवरा मागणार मोदींकडे दाद

सीमा हैदर आणि सचिनची 'गदर लव्हस्टोरी'; पाकिस्तानी नवरा मागणार मोदींकडे दाद

चित्रपटाप्रमाणे पाकिस्तानातून भारतात येऊन लग्न करणारी सीमा हैदर सध्या चर्चेत आहे. ती आता उत्तर प्रदेशातील नोएडा येथे सचिन मीनासोबत राहते. मात्र, तिचा पती गुलाम हैदर मात्र वेगळीच गोष्ट सांगत आहे

नवी दिल्ली : चित्रपटाप्रमाणे पाकिस्तानातून भारतात येऊन लग्न करणारी सीमा हैदर सध्या चर्चेत आहे. ती आता उत्तर प्रदेशातील नोएडा येथे सचिन मीनासोबत राहते. सीमा हैदरने पतीला घटस्फोट दिल्यानंतरच ती पाकिस्तानातून आली असल्याचा दावा तिने केला आहे. मात्र,तिचा पती गुलाम हैदर मात्र वेगळीच गोष्ट सांगत आहे. सीमा अजूनही माझी पत्नी असून आमचा घटस्फोट झालेला नाही, असे गुलामचे म्हणणे असून त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे दाद मागितली आहे. एका वृत्तवाहिनीने ही बातमी दिली आहे.

सीमा हैदर आणि सचिनची 'गदर लव्हस्टोरी'; पाकिस्तानी नवरा मागणार मोदींकडे दाद
अजित पवारांकडून परतलेल्या 'या' नेत्याला मोठी जबाबदारी

सीमाचा पती गुलाम हैदर म्हणतो की, मी तिला कोणताही तलाक दिलेला नाही, आमचा प्रेमविवाह झाला होता. मी प्रत्येकाचा दरवाजा ठोठावेन, मोदी सरकारला आवाहन करेन. सीमारेषा कोणत्या कायद्यानुसार सीमा तिथे राहत आहे आणि हिंदू धर्म स्वीकारण्याबाबत बोलत आहेत, असे त्याने म्हंटले आहे.

मला भारतीय माध्यमांद्वारे सीमाची माहिती मिळाली. मी सौदी अरेबियात काम करतो, मी सतत घरी पैसे पाठवतो. ती माझे पैसे घेऊन निघून गेली. आम्ही सतत बोलायचो, तिच्या भावाने मला सांगितले की सीमाशी कोणतीही संपर्क झालेला नाही, असेही गुलाम हैदरने सांगितले आहे.

मात्र, सीमाने सचिन मीनालाच पती असल्याचे सांगितले आहे. ती म्हणाली की, गुलाम आणि त्यांच्या कुटुंबाने कधीही माझा आदर केला नाही. गुलामने मला एकदा नव्हे तर तीनदा तलाक दिला आहे. लग्नानंतर आमचा लगेच घटस्फोट झाला होता, त्यानंतर माझ्या वडिलांनी मला जबरदस्तीने त्यांच्याकडे ठेवले. त्याने मला अनेकदा मारहाणही केली आहे, त्याला आधीच दोन मुले आहेत.

तसेच, मी आता त्याला माझा नवरा मानत नाही. तुम्हाला हवे असेल तर मी कागदोपत्रीवर तलाक देण्यास तयार आहे. मी फक्त भारतातच राहीन, परत कधीच जाणार नाही, मला भारतीय तुरुंगही मान्य आहे, असेही सीमा हैदरने म्हंटले आहे.

सीमा-सचिनची गदर स्टाईल लव्हस्टोरी

पबजी गेम खेळताना सीमा हैदरला सचिन मीनाशी ऑनलाइन ओळख झाली, या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि ती पाकिस्तान सोडून 4 मुलांसहित सचिनकडे आली. सचिन आणि सीमाने सांगितले की, मार्च 2023 मध्ये त्यांचे लग्न नेपाळमधील पशुपतीनाथ मंदिरात झाले. आठवडाभर हॉटेलमध्ये एकत्र राहिल्यानंतर सीमा पाकिस्तानात परतली. यानंतर सीमा हैदरला 4 जुलै रोजी भारतात अटक करण्यात आली होती. जेव्हा तिचे पाकिस्तानचे नागरिकत्व आणि बेकायदेशीरपणे भारतात येत असल्याचे समोर आले होते. मात्र आता त्यांना जामीन मिळाला आहे. सीमा हैदरने 4 मुलांनाही सोबत आणले आहे. आता सर्वजण सचिन आणि त्याच्या कुटुंबासोबत नोएडामध्ये राहत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com