चालत्या ट्रेनमध्ये पाणीपुरी विकतोय हा व्यक्ती; व्हिडिओ व्हायरल

चालत्या ट्रेनमध्ये पाणीपुरी विकतोय हा व्यक्ती; व्हिडिओ व्हायरल

आपल्या जवळपास सगळ्यांनाच खाण्यापिण्याची खूप आवड असते.
Published by  :
Siddhi Naringrekar

आपल्या जवळपास सगळ्यांनाच खाण्यापिण्याची खूप आवड असते आणि त्यासाठी आपल्याला रोज वेगवेगळ्या गोष्टी खायला आवडतात. आपल्या सर्वांना खासकरून स्ट्रीट फूडमध्ये पाणीपुरी खायला आवडते. असे अनेक स्ट्रीट फूड्स आपण आता ऑनलाइन ऑर्डर करत असलो तरी ते खाण्याचा खरा आनंद स्वतः खाण्यात येतो. कारण एकतर रस्त्यावरील खाद्यपदार्थ घरी जाताना थंड होतात किंवा घरी आणल्यानंतर चवीत फरक पडतो.

ऑनलाइनबद्दल बोलायचे झाले तर, आजकाल सोशल मीडिया खूप शक्तिशाली झाला आहे आणि दररोज काही ना काही ते व्हायरल करण्याचे काम करत आहे. अशा परिस्थितीत नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे, जो खासकरून खाद्यप्रेमींसाठी खूप मनोरंजक आहे. कारण या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती ट्रेनमध्ये पाणीपुरी विकताना दिसत आहे.

हा व्हिडीओ खूप मजेशीर वाटतोय, सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून प्रेक्षकांनीही त्याची खिल्ली उडवली आहे. तर दुसरीकडे हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने मीम्सही बनवले.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com