Heat Wave : थंडगार वारे नाही तर उकाड्याची चाहूल; तापमान वाढीने नागरिक त्रस्त
थोडक्यात
मुंबईसह महाराष्ट्रात उन्हाचा कहर
राज्यातून पाऊस परतताच तापमानात मोठी वाढ
दमट वातावरणामुळे नागरिक हैराण
(Heat Wave) राज्यात गेल्या काही दिवसांत जोरदार पाऊस पडला. अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांच्या पीकांचे अतोनात नुकसान झालं. यातच आता राज्यातून पाऊस परतताच गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाडा जाणवत आहे.
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दमट हवामानामुळे उकाड्याचा जोर वाढला आहे. मुंबईसह अनेक भागांत सकाळपासूनच दमट वातावरणामुळे नागरिक हैराण झाले असून कोकण सर्वाधिक तापमान वाढल्याची माहिती मिळत असून यंदा पहिल्यांदाच कोकणात उच्च तापमान झाले आहे.
राज्यात पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहणार असून उकाडा कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पावसाचा निरोप घेतला असून थंडगार वारे नाही तर उकाड्याचं आगमन झाले असून तापमान वाढीने नागरिक हैराण झाल्याचे पाहायला मिळत आहे.