Maharashtra Weather Update : राज्यातील 'या' भागात दोन दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
थोडक्यात
राज्यात दोन दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
पुढील काही दिवस अनेक भागात पावसाची शक्यता
लातूर धरशिवसह कोकण, मध्य महाराष्ट्रासाठी अलर्ट
(Maharashtra Weather Update ) राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांच्या पीकांचे अतोनात नुकसान झालं. यातच आता राज्यात दोन दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
पुढील काही दिवस अनेक भागात पावसाची जोरदार शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात 7 ते 11 ऑक्टोबरदरम्यान तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यांत 7 ऑक्टोबरला, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत 8 व 9 ऑक्टोबरला वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. असे सांगण्यात आले आहे.
मराठवाड्यात पुढील चार-पाच दिवसांत कमाल तापमानात वाढ होईल असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. पुढील 48 तासांत राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस होऊ शकतो. असा अंदाज वर्तवला आहे. ठाणे, पालघर, कोकण किनारपट्टी आणि पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.