Rain Alert
Rain Alert

Rain Alert : आज देशभरात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी

आज देशभरात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

देशभरात पावसाचा जोर वाढणार

बिहार, झारखंडमध्ये पावसाचा अलर्ट

नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

(Rain Alert) आज देशभरात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशभरात पावसाचा जोर वाढणार असून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. दिल्लीत देखील मुसळधार पाऊस पडत असून यमुना नदी अजूनही इशारा पातळीवरून वाहत आहे.

यासोबतच काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. गुजरातमध्ये देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यासोबतच नर्मदा नदी दुथडी भरून वाहत आहे. पंजाबमध्ये देखील पुरस्थिती पाहायला मिळत असून अनेक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

बिहार, झारखंडमध्ये भारतीय हवामान विभागाने पावसाचा अलर्ट दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशभरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com