Maharashtra Rain Update : राज्यात पुढचे पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा
थोडक्यात
राज्यात पुढचे पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा
अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण
बंगालच्या उपसागरात पुढील 24 तासात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार
(Maharashtra Rain Update) राज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणासह पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत.अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टी, ढगफुटी आणि पुराने मराठवाडा, विदर्भातील नागरिक हैराण झाले आहेत.
मागील काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागांतील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यातच आता राज्यात पुढचे पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात पुढील 24 तासात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे.
मराठवाड्यासमोरील संकट आता अधिक गडद होण्याची शक्यता आहे. 25 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर या दरम्यान राज्यासह मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून 27 सप्टेंबर रोजी अतिमुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले असून पूरस्थिती गंभीर झाली आहे यातच आता या पावसाच्या इशाऱ्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.