Maharashtra Weather Update : दिवाळीच्या रोषणाईत पावसाच्या सरी बरसणार! पुढील 4 दिवस 'या' भागात जोरदार पावसाचा इशारा
थोडक्यात
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय
पुढील 4 दिवस जोरदार पावसाचा इशारा
कोकण, गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता
(Maharashtra Weather Update ) राज्यात दिवाळीला सुरूवात झाली आहे. सगळीकडे आनंद आनंद आहे. मात्र यातच आता मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली आहे.
ऐन दिवाळीत अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून याशिवाय उत्तर आणि दक्षिणेकडील काही राज्यातही मुसळधार पाऊस पडू शकतो, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
यातच काल मुसळधार पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. आजपासून पुढील चार - पाच दिवस महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह पावसाचे इशारा देण्यात आला आहेत.मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्याने राज्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून कोकण, गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे.